मनपा निवडणुकीसाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका निवडणुकीसाठी शहर पोलिस सज्ज झाले आहेत. गुरुवारी (दि.१५) मतदान होणार असून तर शुक्रवारच्या मतमोजणीसाठी शहरात तब्बल ४ हजार ६६७ पोलिस अधिकारी-अंमलदार आणि १ हजार ९२८ होमगार्ड, एसआरपीएफ, राखीव दलाच्या सशस्त्र तुकड्या असा ६ हजार ७४५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन राबवत २८ गुन्हेगारांना तडीपार केले असून, तिघांवर मकोका तर चौघांवर एमपीडीएची कारवाई केली आहे. १३८ बूथ संवेदनशील आहेत. 

पोलिस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. शहरात ९०५ प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत. २८३ जणांवर कारवाई झाली करण्यात आली आहे. १३८ बूथ हे संवेदनशील संवेदनशील मानल्या जाणार्‍या जिन्सी, सिटी चौक आणि बेगमपुरा या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
जिन्सी भागात काही दिवसांपूर्वी दोन पक्षांचे कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे संवेदनशील केंद्रांच्या आकडेवारीत सहाची भर पडली आहे. पूर्वी ४२ संवेदनशील केंद्र होती, तर पोलिसांच्या दृष्टीने १३८ बूथ हे संवेदनशील आहेत. या सर्व केंद्रावर राज्य राखीव पोलिस दल आणि केंद्रीय सशत्र पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत.